February 9, 2026

देवधानोरा येथे जनावरांसाठी वंध्‍यत्‍व निवारण शिबीर

  • कळंब-बायफ बीआयएसएलडी व बीएसएस मायक्रोफायनान्स लि. यांच्या संयुक्त विद्यमानातुन व पशुसंवर्धन विभागयांच्‍या मार्गदर्शनाखाली देवधानोरा येथे दि.१९/११/२०२४ रोजी ४० गायी व म्‍हशींची वंद्धत्वची तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये जंतनाशक, गोचीड निर्मूलन तसेच गाभण जनावरांची तपासणी,खरकुत आजाराचे लसिकरण करण्‍यात आली.
    या कार्यक्रमामध्‍ये सर्व पशुंना मोफत उपचार देण्‍यात आले. या कार्यक्रमात डॉ. पुजा राऊत (पशुधन विकास अधिकारी, प वै दा श्रे१खामसवाडी), यांनी पशुपालकांना मार्गदर्शन व जनावराची तपासणी केली . बायफ संस्थे मार्फत चालण्यात येणाऱ्या प्रकल्‍पा मार्फत पशुपालकांना कोणते लाभ मिळणार आहेत या बद्दल अतुल मुळे (प्रकल्‍प समन्वयक, बायफ) यांनी माहिती सांगितली व पशुपालकांना लिंग निश्चित विर्य (सॉर्टेड सिमेन) याचा उपयोग करुन पशुपालकांचे उत्‍पन्‍न कशाप्रकारे वाढेल याबद्दल माहिती देण्‍यात आली. गावातील पशुपालकांना सॉर्टेड सिमेन , पारंपारीक सिमेन , चारा बियाणे,मिनरल मिक्स्चर हे बीएसएस माक्रो फाईनान्स ली . याच्या सामाजिक जबाबदरीतून त्यांच्या अर्थसाह्याने पशूपालकांना सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहे तरी यांचा पशूपालकांनी लाभ घेण्याचे अहवान बायफ संस्थे मार्फत करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी लाभांच्या योजना व त्या बाबतही माहिती सांगण्यात आली. पशुपालकांचे जनावर गाभण न जाण्‍यामुळे होणारे नुकसान कमी करण्‍यासाठी अशाप्रकारे वंध्‍यत्‍व निवारण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले या मध्ये बायफ संस्थे मार्फत व पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत सर्व औषध उपचार व खनिज मिश्रण , लसिकरण पशूपालकांना मोफत देण्यात आले.
    या कार्यक्रमास बायफचे कर्मचारी संताजी मिसाळ, कृत्रीम रेतन तंत्रज्ञ व पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी डॉ.पुजा राऊत,रोहन मिसाळ हे उपस्थित होते.
    या कार्यक्रमास पशुपालकांनी उत्‍सफूर्त प्रतिसाद दिला.
error: Content is protected !!