कळंब – भारत जोडो अभियानच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात जागर विधानसभा निवडणुकीचा अशी पत्रिके कोपरा सभा व बैठका घेऊन वाटण्यात आली. १५ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (डोळा) येथे महादेव टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरा सभा घेण्यात आली.
यावेळी सुभाष लोमटे, भाऊसाहेब पठाडे,भागवतराव धस यांनी मार्गदर्शन केले तर मोहा येथे रमेश मोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कोपरा सभेत भाऊसाहेब पठाडे, सुभाष लोमटे यांनी महागाई, बेरोजगारी,खाजगीकरण भाजपा सरकारचे विषमतावादी धोरण आणि लोकशाहीचा गळा घोटला जात असून संविधान मोडीत काढण्याचा होत असलेला प्रयत्न उदाहरणासह सांगून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. या सभेचे सूत्रसंचालन भारत जोडो अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष घोडके यांनी केले. प्रस्ताविक स्वराज इंडिया कळंब शहराध्यक्ष माधवसिंग राजपूत यांनी तर आभार धाराशिव विधानसभा समन्वयक सुरेश शेळके यांनी केले मानले.
More Stories
“जिल्हा परिषद निवडणुकीत मंगरूळ गटाचा अजेंडा:विकास की फक्त राजकारण?”
“स्वप्नातील घर” साकारले : पिंपळगाव (डोळा) येथे सदघर योजनेअंतर्गत सुभाष घोडके यांच्या घराचा भव्य शुभारंभ
शेतात राबणाऱ्या हातांचा गौरव; राष्ट्रीय शेतकरी दिनी पांडुरंग आंबीरकर यांचा शेतातच सत्कार