August 9, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात पंडित नेहरूंना अभिवादन

  • मोहा – येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणजेच बाल दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी संजय जगताप यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांच्यासह विद्यार्थी व सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!