कळंब – आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानच्या यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कारासाठी लेखिका माया मुळे यांना निवड करण्यात आली आहे. भिडेवाडा ही देशातील पहिली मुलींची शाळा असून कवी विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानात तसेच बा ज्योतिबा आणि माय सावित्री यांच्या विचारांचा वसा घेऊन या चळवळीत कार्य करणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी,कार्याला गती व प्रोत्साहन मिळावे म्हणून मानाच्या,प्रतिष्ठेच्या अशा ‘आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कारांची’ घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये लेखिका माया सूर्यकांत मुळे यांची निवड करण्यात आलेली आहे. दिनांक २ ते ५ जानेवारी महिन्यात देशात पहिल्यांदाच होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल’ एस एम जोशी सभागृह, पुणे. येथे दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. माया मुळे या विद्याभवन हायस्कूल कळंबच्या विद्यार्थिनी आहेत.फर्ग्युसन महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांच्या काहूर या कविता संग्रहाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्काराच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात