August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.10 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 129 कारवाया करुन 1,16,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-निकीता अक्षय कुंदारम, वय 26 वर्षे,रा. 84/1 न्यु पाच्चा पेठ, हुचन नगर, सोलापूर ता.जि सोलापूर या दि. 05.11.2024 रोजी श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शनासाठी आल्या असता गणपती मंदीरासमोर असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून निकीता कुंदारम यांचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निमीता कुंदारम यांनी दि.10.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-हरीदास गजेंद्र बारगुले, रा. पिंपळगाव डोळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.30.10.2024 रोजी 23.00 वा. सु. शाहु बारगुले यांचे घरासमोर पिंपळगाव डोळा येथे फिर्यादी नामे-अमोल उत्रेश्वर बारगुले, वय 34 वर्षे,व्य. एसबीआय ग्राहक सेवा केंद्र, रा.पिंपळगाव डोळा ता. कळंब जि. धाराशिव यांना दाखल केलेली कर्जाची फाईल मंजुर होवून देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल बारगुले यांनी दि.10.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 117(2),352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-चंद्रकांत विश्वनाथ मनुरे, सुकुमारबाई चंद्रकांत मनुरे, महावीर चंद्रकांत मनुरे, प्रविण चंद्रकांत मनुरे रा. एकुरगावाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.07.11.2024 रोजी 19.00 वा. सु.एकुरगावाडी शिवारात फिर्यादी नामे-उषा प्रकाश मनुरे, वय 41 वर्षे, रा.एकुरगावाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांना शेत रसत्याच्या कारणावरुन म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठीने व दाताने चावा घेवून मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उषा मनुरे यांनी दि.10.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 118(1),115(2),352, 351(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुवर्णा पांडुरंग तिगाडे, शिवम पांडुरंग तिगाडे, रा. बेंबळी ह.मु. भोसले कॉलेजचे पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.10.11.2024 रोजी 11.30 वा. सु.महादेववाडी शिवार येथे फिर्यादी नामे-सुनिता नामदेव तिगाडे, वय 40 वर्षे, रा.बेंबळी ता. जि. धाराशिव यांना शेतात गवत घेण्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिता तिगाडे यांनी दि.10.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 118(1), 352, 351(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अवैध मद्य विरोधी मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 09 छापे.”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल रविवार दि.10.11.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 09 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 1,700 लिटर, सुमारे 271 लिटर गावठी दारु व सिंधी ताडी अम्ली द्रव एकुण 158 लिटर असे मद्य जप्त केले. जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1,11,700 ₹ आहे. यावरुन 09 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 09 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 छापे टाकले. यावेळी भातागळी, ता. लोहारा जि. धाराशिव येथील-मालन संतोष तेलंग, वय 35 वर्षे, हे 10.45 वा.सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर 70 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले. तसेच लोहारा बु., ता. लोहारा जि. धाराशिव येथील- विजय लक्ष्मण कल्यामोळ, वय 20 वर्षे, हे 11.30 वा.सु. बसस्थानक चे पाठीमागे लोहारा बु., येथे 88 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
  • 2)ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 छापे टाकले. यावेळी दुधगाव ता. जि. धाराशिव येथील- आशा शंकर पवार, वय 35 वर्षे, या 13.35 वा.सु. दुधगाव पारधी पिढी येथे 1,300 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली. तसेच दुधगाव ता. जि. धाराशिव येथील-अंजली बबन पवार, वय 28 वर्षे, या 14.05 वा.सु. दुधगाव पारधी पिढी येथे 100 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली.
  • 3)तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने देवसिंगा गावात छापा टाकला. यावेळी देवसिंगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-अविनाश संभाजी मस्के, वय 35 वर्षे, हे 20.00 वा. सु. आपल्या हॉटेलच्या बाजूला देवसिंगा येथे 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली.
  • 5)मुरुम पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 छापे टाकले. यावेळी कलदेव निंबाळा ता.उमरगा जि. धाराशिव येथील- शिवमुर्ती लिंबाजी नंदगावे, वय 75 वर्षे, हे 19.00 वा. सु. प्रविण पवार यांचे शेताजवळ कडदोरा येथे 52 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली. तसेच लमाणतांडा आष्टाकासार जि. धाराशिव येथील- अनिता उमेश जाधव, वय 47 वर्षे, या 17.30 वा. सु. पाण्याचे टाकीजवळ लमाण तांडा येथे 39 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली.
  • 6)कळंब पोलीस ठाण्याच्या पथकाने इंदीरानगर कळंब येथे छापा टाकला. यावेळी इंदीरानगर कळंब ता.कळंब जि. धाराशिव येथील- ललीता संजय पवार, वय 36 वर्षे, हे 16.35 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 400 लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
  • 7)परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने हॉटेल महाराजा येथे छापा टाकला. यावेळी सोमवार गल्ली, परंडा ता. परंडा जि. धाराशिव येथील- सारंग पांडुरंग बोराडे, वय 25 वर्षे, हे 17.40 वा. सु. हॉटेल महाराजा चे बाजूला 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेली असताना पथकास आढळली.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!