कळंब – भारत उत्थान ट्रस्टच्या वतीने लखनौ येथील उत्तर प्रदेश हिंदी संस्थेच्या प्रेमचंद सभागृहात ‘भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या हिंदी साहित्यकारातून निवड करण्यात आलेल्या विद्वानापैकी हिंदी साहित्य आणि भूमिका तसेच महावीर प्रसाद द्विवेदी सन्मान’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पद्मश्री पुरस्कार प्राप्त विद्या बिंदू सिंग आणि ट्रस्टचे केंद्रीय अध्यक्ष सुजित कुंतल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात डॉ.दत्ता साकोळे हे हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हिंदी साहित्यातील त्यांच्या विशेष सेवेबद्दल, विविध प्रांतातून निवड झालेल्या साहित्यिकांमधून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, केंद्राध्यक्षांनी डॉ.दत्ता साकोळे यांची महाराष्ट्र राज्य युनिट अध्यक्ष म्हणून घोषणा केली आणि त्यांना युनिटची जबाबदारी पार पाडण्यास सांगितले. डॉ.दत्ता साकोळे गेल्या 25 वर्षांपासून हिंदी शिक्षकाची भूमिका साकारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 1999 ते 2009 या काळात त्यांनी विवेक वर्धिनी कॉलेज, जामबाग, हैदराबादच्या हिंदी विभागात काम केले. पुढे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 2009 पासून आतापर्यंत हिंदीचे शिक्षण देत आहे. पीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत 12 पुस्तके हिंदी भाषेत प्रकाशित झाली आहेत. 100 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर