August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटच्या वतीने नागटिळक यांचा सत्कार

  • कळंब – तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेटच्या मुख्य कार्यालयात ढोकी येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी नारायण नागटिळक यांची इ-फेरफार प्रणाली अनुषंगिक मोडुल मध्ये सोई सुविधा, अडचणी,सुधारणा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून स्थायी समितीमध्ये समावेश झाल्याबद्दल मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांनी त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
    यावेळी माझी सरपंच बाबासाहेब मडके,तेरणा कारखान्याचे माजी संचालक उध्दव मडके, देवी नंदा अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे चेअरमन अतुल मडके, व्यंकटेश्वरा वेअर हाऊस चे मालक मनोज जोशी,अशोक मडके,कोकाटे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!