खोंदला – लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात चि.यश धम्मपाल वाघमारे श्री. शरदचंद्रजी पवार विद्यालय,खोंदलाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाली आहे. सदरील खेळाडूस श्री शरदचंद्रजी पवार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा शारीरिक शिक्षिका श्रीम.संगीता धाबेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यश धम्मपाल वाघमारे या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. शाळेच्या मुख्याध्यापिका तथा शारीरिक शिक्षका श्रीम.संगीता धाबेकर सहशिक्षक,महादेव भोंडवे,दीपक राऊत, दत्तू तावसे,बालासाहेब मुळे,रोहिदास सर्जेराव, गोविंद चव्हाण यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात