धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात ४ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये २४० – उमरगा,२४१ – तुळजापूर,२४२ – उस्मानाबाद आणि २४३ -परंडा विधानसभा मतदारसंघ येतात. मंगळवारी दि.२२ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नाही. दि.२२ ऑक्टोबर रोजी ९९ इच्छूक उमेदवारांनी २१४ अर्ज खरेदी केले.यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी १९ व्यक्तींनी ३५ अर्ज,तुळजापूर मतदारसंघासाठी २८ व्यक्तींनी ७३ अर्ज,उस्मानाबाद मतदारसंघासाठी २७ व्यक्तींनी ५२ अर्ज आणि परंडा विधानसभा मतदारसंघासाठी २५ व्यक्तींनी ५४ अर्जाची खरेदी केली. *निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे* अधिसूचना जाहीर करणे -२२ ऑक्टोबर, नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख – २९ ऑक्टोबर,नामांकनाची छाननी -३० ऑक्टोबर,नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख – ४ नोव्हेंबर, मतदान तारीख – २० नोव्हेंबर आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य