पारा (यशपाल सोनकांबळे) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. लअशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा येथे मतदार जागृत करण्यासाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजनकरण्यात आले होते. या वेळी मुख्याध्यापक सूर्यवंशी एन.बी,सहशिक्षिका श्रीम.मेटे एस व्ही,सहशिक्षिक मुरकुटे डी. व्ही,वाघमारे सर,माळी सर,बांगर सर,मुळे सर,अमोल गवळी,पौळ सर इ शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. तसेच प्रशालेतील नववी व दहावीचे विद्यार्थी यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदानाचा हक्क,मतदानचे महत्व,मतदान माझा अधिकार, मतदान राष्ट्रीय कर्तव्य,मतदार जनजागृती,लोकशाही या विषयावर निबंध लेखन करण्यात आले. सदरील निबंध लेखन स्पर्धेत महिला,युवक,मतदार, दिव्यांग मतदार,जेष्ठ नागरिक, भविष्यातील मतदार यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
More Stories
माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेची नाळ;जय भवानी विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन व खाऊ वाटप
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालयात अभिवादन
जय भवानी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा