August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.14 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 121 कारवाया करुन 90,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-रवी नारायण नेरला, वय 44 वर्षे,रा. वडगाव गांजा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.14.10.2024 रोजी 18.30 वा. सु. हॉटेल दुर्गा माताचे पाठीमागे अंदाजे 760 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 19 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-निता महादेव काळे, वय 35 वर्षे,रा.इंदीरानगर ता.कळंब जि. धाराशिव या दि.14.10.2024 रोजी 19.34 वा. सु. इंदीरानगर कळंब अंदाजे 18,000 ₹ किंमतीचे 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-राजेभाउ तात्याराम शिंदे, वय 50 वर्षे, रा.टोकणी वस्ती कोठाळवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.14.10.2024 रोजी 18.30 वा. सु.टोकणी वस्ती येथे अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लता बाबुराव पवार, वय 42 वर्षे, रा.पारधी वस्ती डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव या दि.14.10.2024 रोजी 18.10 वा. सु.पारधी वस्ती डिकसळ येथे अंदाजे 12,600 ₹ किंमतीची 210 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-धनंजयगोकुळ चाबुकस्वार वय 35 वर्षे, रा.भांडगाव ता. परंडा जि. धाराशिव, प्रथमेश माहेश काळे, वय 25 वर्षे, रा.शिंगोली ता. जि. धाराशिव,दिनेश श्रीकृष्ण मगर, वय 28रा. शिंगोली ता.जि.धाराशिव यांनी दि.14.10.2024 रोजी 19.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे रिक्षा क्र एमएच 25 एके 8779, रिक्षा क्र एमएच 25 एके 0552 व रिक्षा क्र एमएच 25 एके 1735 ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सेट्रंल बिल्डीगं कडे जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आंबी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-पार्वती पोपट आवटे, वय 35 वर्षे, रा. मलकापूर ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात चार व्यक्तीने दि.13.10.2024 रोजी 21.30 ते दि. 14.10.2024 रोजी 03.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने वरेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण 3,04,900₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पार्वती आवटे यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-जगन्नाथ रामेश्वर वाडकर, वय 42 वर्षे, रा.वडगाव सिध्देश्वर ता. जि.धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 एएफ 6823 ही दि.09.10.2024 रोजी 21.30 ते दि. 10.10.2024 रोजी 07. 00 वा. सु.समता कॉलनी सह्याद्री कॉर्नर दुध डेअरी समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जगन्नाथ वाडकर यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-जीशान खलील रहेमान सिद्दीकी, वय 31 वर्षे, रा. खिरणी मळा ता.जि.धाराशिव यांचा अंदाजे 4,30,000₹ किंमतीचा अशोक लिलॅन्ड कंपनीचा ट्रक क्र एमएच 40 बीएल 9302 हा दि.12.10.2024 रोजी 21.00 ते 23.30वा. सु.काटी रोडवरील मसला पाटी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जीशान खलील सिद्दीकी यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सिध्देश्वर उत्तम चौगुले, वय 38 वर्षे, रा.चौगुले वस्ती बादलकोट ता. पंढरपुर जि.सोलापूर यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 13 बीएच 0994 ही दि.02.10.2024 रोजी 07.30 ते 11.15 वा. सु.दिपक चौक तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सिध्देश्वर चौगुले यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-उत्तम भैरु कुमानाचे, वय 39 वर्षे, रा. गणेश नगर बेळगाव कर्नाटक हे त्यांचे मित्र हे 17 सिटर टॅम्पो ट्रॅव्हलर गाडी क्र केए 22 डी 0068 या मध्ये गणेश नगर बेळगाव कर्नाटक येथुन केदारनाथ येथे जात होते. दि. 14.10.2024 रोजी 01.00 ते 02.00 वा. सु. येडशी टोलनाका ते पारगाव टोलनाका दरम्यान अज्ञात व्यक्तीने टॅम्पो ट्रॅव्हलर मधील ट्रॅाली टाईप इटकरी, काळ्या, रेड, ब्राउन व इतर रंगाच्या 13 बॅग ज्यामधील रोख रक्कम 70,000₹ कादपत्रे व कपडे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उत्तम कुमानाचे यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-आण्णा तानाजी खांडेकर, ओम तानाजी खांडेकर, महादेव खांडेकर तिघे रा. काक्श्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.11.10.2024 रोजी 15.00 वा. सु. काक्रंबा गावातील पेठ गल्ली येथील मारुती मंदीरासमोर फिर्यादी नामे-अभिषेक लक्ष्मण देवकते, वय 22 रा.खंडोबा गल्ली कांक्रबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व लाकडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच मोबाईल व मोटरसायकलचे नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिषेक देवकते यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2),324(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-नितीन क्रांतीवीर खंडागळे, राजु रसाळ,अजय रसाळ,सुदर्शन खंडागळे, विवेक रसाळ, क्रांतीवीर खंडागळे, शंभु रसाळ, साहील रसाळ सर्व रा.ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.12.10.2024 रोजी 18.30 ते 19.00 वा. सु. कांबळे यांचे दुकानाजवळ व ग्रामपंचायत कार्यालयाजवळ फिर्यादी नामे-निलेश पोपट कसबे, वय 23 वर्षे, रा. साठेनगर ढोकी ता. जि. धाराशिव यांना व त्यांचा चुलत भाउ शुभम कसबे यांना नमुद आरोपींनी मोटरसायकलने कट मारण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कातडी बेल्ट व फरशीचे तुकड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निलेश कसबे यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 189(2),190, 191(2), 191(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-निलेश पोपट कसबे,पोपट हिरा कसबे, राजेंद्र हिरा कसबे, लक्ष्मण हिरा कसबे, शुभम राजेंद्र कसबे, तेजश पोपट कसबे,योगेश लक्ष्मण कसबे, संदीप गोकुळ कसबे सर्व रा.ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.12.10.2024 रोजी 19.00 वा. सु. कांबळे यांचे दुकानाजवळ व ग्रामपंचायत कार्यालयाजवळ फिर्यादी नामे-जनाबाई हनुमंत रसाळ, वय 43 वर्षे, रा. साठेनगर ढोकी ता. जि. धाराशिव या पालखीच्या पाया पडण्यासाठी गेल्या असता ढकलून दिल्याने ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायदृयाची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंड रॉड व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा अजय पुतण्या अजित यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जनाबाई रसाळ यांनी दि.14.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 189(2),190, 191(2), 191(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!