धाराशिव – शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 208 कारवाया करुन 1,93,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे-योगेश अनुरथ वरपे, वय 35 वर्षे, रा. मस्सा ता. कळंब जि. धाराशिव हे दि 26.09.2024 रोजी 14.55 वा. सु. मस्सा खं येथे अंदाजे 3,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 22 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-खंडु उमराव लोहार, वय 38 वर्षे, रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 26.09.2024 रोजी 17.00 वा. सु. तुळजापूर ते लातुर जाणारे रोडलगत शंभु हॉटेलचे शेजारी वडगाव लाख शिवारात अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शरद खंडु सातपुते, रा.सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 26.09.2024 रोजी 19.30 वा. सु. सिंदफळ गावात जाणारे रोडलगत सिंदफळ येथे अंदाजे 960 ₹ किंमतीची 12 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-दुशाला केरबा मोरे, वय 65 वर्षे, रा. राघुचीवाडी ता. जि. धाराशिव हे दि 26.09.2024 रोजी 19.00 वा. सु. गावातील आपल्या राहते घरासमोर अंदाजे 3,200 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सिता पंजा पवार, वय 65 वर्षे, रा. जुना बस डोपो पापणास नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि 26.09.2024 रोजी 18.45 वा. सु. सिंदफळ गावात जाणारे रोडलगत सिंदफळ येथे अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
तामलवाडी पोलीस ठाणे: आरोपी नामे-तोळाबाई धनाजी शिंदे, वय 60 वर्षे, रा. सांगवी काटी ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि 26.09.2024 रोजी 18.00 वा. सु. गावातील आपल्या राहते घराचे समोर अंदाजे 900 ₹ किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.26.09.2024 रोजी 19.40 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत भोसले गल्ली शुक्रवार पेठ लगत तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-यासीन नुरमहमंद तांबोळी, रा. भोसले गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 19.40 वा. सु. भोसले गल्ली शुक्रवार पेठलगत तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.26.09.2024 रोजी 21.10 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत संतोष गुरव यांचे पत्र्याचे शेडसमोर कसगी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- दिपक गणपतराव भोसले, वय 39 वर्षे, संतोष गुरव दोन्ही रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे 21.10 वा. सु. संतोष गुरव यांचे पत्र्याचे शेडसमोर कसगी येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह मोबाईल फोन एकुण 6,810 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.26.09.2024 रोजी 11.30 ते 13.15 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-सोनी मच्दिंद्र पवार, वय 33 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव या 11.30 वा. सु. बसस्थानक भुमचे स्टॅन्ड भुमचे गेटचे बाहेरील उजवे बाजूस सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-अनिलबबन शिर्के, वय 38 वर्षे, रा. चिंचोली ता. भुम जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. बसस्थानक भुमचे मागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-किसन लिंबाजी क्षिरसागर, वय 27 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव, राजु देविदास भिसे, वय 33 वर्षे, रा. एस टी कॉलनी मारुती मंदीर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.09.2024 रोजी 12.20 ते 12.35 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1476 व छोटा हत्ती क्र एमएच 25 पी 3966 हा आष्टा मोड येथे आष्टाकासार गावात जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- निजाम आलम उबीर, वय 53 वर्षे, रा.सैदा गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.क्यु 8284 ही दि.22.09.2024 रोजी 17.30 वा. सु. 18.00 वा. सु. जिल्हा परिषद शाळा मुरुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निजाम उबीर यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-नसिम शरीफ तांबोळी, वय 60 वर्षे, रा. तांदुळवाडी रोड वाशी ता. वाशी जि. धाराशिव या दि. 24.09.2024 रोजी 15.30 वा. सु. कळंब बस्थानक येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून नसिम तांबोळी यांचे गळ्यातील 4 ग्रॅम वजनाचं सोन्याचे दागिने अंदाजे 10,000₹ किंमतीचे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नसिम तांबोळी यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- बालाजी केरबा एडेकर, वय 52 वर्षे, रा.देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 45,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 बी.बी 0476 इंजिन नं HA11E8P4H24062 चेसी नं MBLHAW234P4H17534 ही दि.20.09.2024 रोजी 19.00 ते 23.00 वा. सु. बालाजी एडेकर यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी एडेकर यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- अशोक सर्जेराव शिंदे, वय 32 वर्षे, रा.सिध्देश्वर पिंपळगाव ता. घणसांगवी जि. जालना ह.मु. लाखनगाव ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 21 बी.एन 9982 इंजिन नं JC65ED0288313 व चेसी नं ME4JC65CMKD072874 ही दि.26.09.2024 रोजी 13.15 ते 14.30 वा. सु. लाखनगाव शिवारात अशोक गुंजाळ यांचे शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक शिंदे यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-दत्ता रंगनाथ गायकवाड, निखली नितीन कांबळे, विनोद रामचंद्र गायकवाड, सर्व रा. एरंडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.24.09.2024 रोजी 11.30 वा. सु.एरंडगाव येथे फिर्यादी नामे-सचिन सदाशिव कदम, वय 28 वर्षे, रा. एरंडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी म्हैस रोडच्या कडेला बांधण्याच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.तसेच फिर्यादीचे आई वडील हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन कदम यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 109, 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-श्रीमंत उर्फ बाबा रमेश भोसले, रोशन रमेश भोसले, दोघे रा. ईट ता. भुम जि. धाराशिव, आण्णा साळुंखे, रा. डोकेवाडी, ता. भुम, सुनिल देशमुख, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.23.09.2024 रोजी 10.00ते 11.00 वा. सु.ईट येथे धाराशिव येथे फिर्यादी नामे-आश्रु दादाराव थोरात, वय 35 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठी व लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी फिर्यादी यांचे गळ्यातील 5 तोळ्याची चैन व 5 ग्रॅमची सोन्याची अगंठी काढून घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आश्रु थोरात यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 119(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5), सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1) (आर)(एस)(व्हीए), 3 (2) (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- आकाश राठोड, सुभाष राठोड, इतर तीन इसम यांनी दि.25.09.2024 रोजी 09.30 वा. सु.बसस्थानक धाराशिव येथील पानटपरी जवळ फिर्यादी नामे-रविशंकर भालचंद्र लगदिवे, वय 38 वर्षे, रा. तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मुलाने टपरी पुढे नैसर्गिक विधी करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टीलची जाड प्लेट व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रविशंकर लगदिवे यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3), 189(2),190 सह कलम 37 (1)(3), 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-नारायण साठे, उमेश साठे, मंगेश साठे, दत्तात्रय साठे सर्व रा. साठेनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.26.09.2024 रोजी 16.00 वा. सु.भुम येथील आठवडी बाजारात फिर्यादी नामे-यशपाल युवराज गायकवाड, वय 31 वर्षे, रा. भिमनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांना व त्यांचा मावस भाउ नितीन शहाजी शिंदे यांना नमुद आरोपींनी शेव चिवड्याचे पैसे देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विळा व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच साक्षीदार यांचे दुकानाचे 15 हजार रुपयाचे नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-यशपाल गायकवाड यांनी दि.26.09.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 352, 351(2), 324 (4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी