कळंब ( राजेंद्र बारगुले ) – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा कळंबच्या वतीने डॉ.आदित्य सौलाखे यांचा सत्कार करण्यात आला. आदित्य सौलाखे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून, शिक्षण घेत असताना आलेल्या अनेक संकटावर मात करत,जिद्द चिकाटी,कठोर परिश्रम यातून यश संपादन केले आहे. एमबीबीएस शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे निवड झाली आहे. या मिळवलेल्या यशाबद्दल अखिल भारतीय कथामाला शाखा कळंबच्या वतीने आदित्य सौलाखे यांचा धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,अखिल भारतीय सानेगुरुजी कथामला शाखा कळंब तालुकाध्यक्ष सोपान पवार,जेष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,कोषाध्यक्ष प्राचार्य महादेव गपाट,पत्रकार प्रदीप यादव यांच्या हस्ते शाल,बुके देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी डॉ.आदित्य सौलाखे यांच्या मातोश्री श्रीमती राधा सौलाखे,सौ.मंजुषा पवार,सौ.प्रा.अश्विनी सौलाखे,बापूराव सौलाखे,सचिन सौलाखे आदी सौलाखे कुटुंब उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे