June 21, 2025

मोहेकर महाविद्यालयामध्ये युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

  • कळंब – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय आयटीआय कळंब चे प्राचार्य के.जे.पवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार व उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान ,कौशल्य विभाग धाराशिव येथील बनसोड तसेच जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक हनुमंत मडके यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमाकरिता परिसरातील आस्थापना,उद्योग, व्यवसाय,संस्था यांना प्रशिक्षणार्थी नियुक्ती करिता तयार करणे आणि पात्र प्रशिक्षणार्थी यांना अशा नियुक्तीची संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्या करिता कृष्णा हॉस्पिटल कळंब,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोहा व मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड मोहा तसेच इतर आस्थापना उपस्थित होत्या.
    याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर, आय.टी.आय कळंब चे प्राचार्य के.जे.पवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक 
    बापुराव शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन मानेकर यांनी केले.या मेळाव्याच्या नियोजन यशस्वीते करिता महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ.संदीप महाजन, प्लेसमेंट सेलचे डॉ.हेमंत चांदोरे तसेच एच.एस.सी.व्होकेशनल विभागातील कर्मचारी बुधवंत,माने,सुरवसे व करंजकर यांनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!