कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छ्त्रपती संभाजीनगर आणि व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय,धाराशिव आयोजित नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयातयीन झोनल मॅचेस मध्ये क्रॉस कंट्री या क्रीडा प्रकारात ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील खेळाडू अशोक बालाजी मुंडे १० किमी क्रॉस कंट्री (४२:४७) टाइम घेऊन प्रथम क्रमांक पटकावला व पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,क्रीडा शिक्षक प्रा. साहेबराव बोंदर,प्रा.सूरज गपाट तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी