June 24, 2025

नृसिंह गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

  • कळंब – तालुक्यातील माळकरंजा येथील नृसिंह
    गणेश मंडळांने गावातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. नृसिंह मंडळाचे अध्यक्ष गोरोबा नरसिंग लोमटे, उपाध्यक्ष जयसिंग भोईटे,सदस्य संकेत मुळे व महेश कराड यांच्या प्रयत्नातून गणपती मंडळाच्या जमा केलेल्या लोक वर्गणीतून काही रक्कम शिल्लक ठेवत शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना गणवेश,शालेय दप्तर यांचे तर इयत्ता साहवी सातवी च्या विद्यार्थ्यांना कंपास आणि उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी नृसिंह गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याचे कौतुक करत वर्गणी चा योग्य विनियोग खऱ्या अर्थाने आपण केलात. डीजे लावून विनाकारण पैसा खर्च करण्यापेक्षा ही वर्गणी योग्य त्या सत्कार्यात खर्च होत असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद गालट, सरपंच विजय शिंदे, प्रकाश लोमटे, पांडुरंग लोमटे, प्रमोद लोमटे, रत्नदीप लोमटे तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी सारंग सह शिक्षक हनुमंत घाडगे,संजय ओव्हाळ,श्रीमती भारती सूर्यवंशी, निदेशक मंजुश्री कराड सह शिक्षणाप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रम सूत्रसंचालन कुमारी कीर्ती मोहिते हिने तर आभार प्रदर्शन कुमारी समीक्षा निकम हिने केले.
error: Content is protected !!