September 25, 2026

प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर यांचे अभिष्टचिंतन

मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने “ज्ञान दीप लावू जगी” हे संत नामदेवांचे ब्रीदवाक्य घेवून मराठवाड्यात बहुजनांच्या मुलांना आधुनिक दर्जेदार शिक्षण देत असलेले ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील मोहा येथे ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सहशिक्षक संजय मडके, सहशिक्षिका निता सोनवणे, उषा पांचाळ,प्रा.प्रतिभा सावंत आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!