कळंब – सोजर मतिमंद निवासी शाळेत १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कळंब शहरातील सामाजीक व अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह.भ.प महादेव महाराज आडसुळ, ज्येष्ठ समाजसेवक व सेवा निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय कुलकर्णी व ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपुत यांची उपस्थिती होती.सर्व प्रथम मराठवाडा मुक्ती संग्रामचे जनक “स्वामी रामानंद तीर्थ” यांच्या प्रतिमेचे पूजन महादेव महाराज अडसूळ, डि.के कुलकर्णी. माधवसिंग राजपूत व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत बेडके यांनी केले तर ध्वजारोहण महादेव महाराज अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे यांनी मुक्ती संग्राम दिना विषयी माहिती सांगितली.पाहुण्याचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक चद्रकांत बेडके व शाळेतील शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. शिक्षक मनोगत अभिजीत होनराव सर व शाळेविषयी माहिती बळीराम मिटकरी यांनी सांगितली . व आभार शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत बेडके यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले