August 9, 2025

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार सरसकट द्या;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दुधगावकर यांची मागणी

  • धाराशिव – जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजाराची मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे शुक्रवारी केली आहे.
    कृषिमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की,मागील पंधरा दिवसांमध्ये जिल्ह्यातील जवळपास निम्म्या महसूल सर्कलमधील जवळपास ३०० गावांमध्ये आर ते दहा हजार हेक्टरवरील सोयाबीन, उडीद, मूग, मका, कांदा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. याशिवाय पपई, पेरू,डाळिंब यासह सर्व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी झालेली आहे. त्याची शासन दरबारी नोंददेखील झालेली आहे,तर काहींची नोंद झालेली नाही.अशा सर्व शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी सरसकट हेक्‍टरी ५० हजाराची मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत चार महिन्यापासून मिळालेली नाही. ती आर्थिक मदत ताबडतोब मिळणे अत्यंत गरजेचे आहे.तरी शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी,अशी मागणी केली आहे.
error: Content is protected !!