धाराशिव (जिमाका) – पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद या कार्यालयाकडून 2023-24 या आर्थिक वर्षात चारा टंचाईच्या अनुषंगाने वैरण बियाणे वाटप वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी दिनांक 25/10/2023 ते दिनांक 03/11/2023 या कालावधीत अर्ज मागणी करण्यात येत आहे. दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम ) वैरण बियाणे वाटप करणे. दिनांक ४ नोव्हेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखाने, पशुधन विकास अधिकारी (वि,) पंचायत समिती येथे संपर्क साधावा अर्जाचा विहित नमुना,मार्गदर्शक सुचना,नियम,अटी व सोबत जोडावयाची कागदपत्राची सुची पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.तसेच एन.आय.सी. www.dharashiv.nic.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तरी जास्तीत जास्त लाभार्थींनी उक्त योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी