August 9, 2025

कळंब येथे मोफत कॅन्सर शिबीर संपन्न

  • कळंब- इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब कळंब सिटी, विजया नर्सिंग होम आणि ईनरव्हील क्लब कळंब च्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी उपजिल्हा रूग्णालय कळंब येथे मोफत कॅन्सर शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात २७ पेशंटनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी ७ रूग्णांची पॅप स्मियर टेस्ट साठी सॅंपल घेण्यात आले. यासाठी बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल च्या तज्ञांनी पेशंटची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले.
    यावेळी शिबीर संयोजक डॉ रामकृष्ण लोंढे, आय एम ए सचिव डॉ.सत्यप्रेम वारे,वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.दीपली लोंढे यांनी आभार मानले. शिबिराला जोडुनच कॅन्सर विषयी पोस्टर्स प्रदर्शित केले होते. त्याचा पेशंटचे नातेवाईक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घेतला.
    शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिजित लोंढे, आय एम ए अध्यक्ष डॉ.कमलाकर गायकवाड, सचिव डॉ.सत्यप्रेम वारे, कोषाध्यक्ष डॉ.शिल्पा ढेंगळे, डॉ.वर्षा कस्तुरकर, रोटरी अध्यक्ष रवी नारकर, सचिव डॉ.साजेद चाऊस, ईनरव्हील अध्यक्षा डॉ. आकांक्षा पाटील, सचिव जेमीनी भिंगारे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. दिपाली लोंढे, डॉ.शरद दशरथ, डॉ. मिरा दशरथ, तानाजी कदम, संभाजी कोळी, परशुराम कोळी, परमेश्वर मोरे सर ई नी परिश्रम घेतले
error: Content is protected !!