August 9, 2025

श्रीगणेशाच्या आगमनदिनी मद्यविक्री राहणार बंदी

  • धाराशिव (जिमाका) – गणेशात्सव काळात जिल्हयात सर्व ठिकाणी सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी मुंबई दारुबंदी कायदा कलमान्वये मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे यांनी दिलेल्या आदेशात ७ सप्टेंबर १०१४ रोजी श्रीगणेश आगमन (श्री गणेश मूर्तीची स्थापना ) होत असल्याने यादिवशी जिल्हयात सर्व ठिकाणी सार्वजनिक शांतता अबाधित रहावी याकरिता मुंबई दारुबंदी कायदयामधील कलमाच्या अधिकाराचा वापर करून जिल्हयातील सर्व प्रकारच्या किरकोळ देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या ७ सप्टेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.अनथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायद्यातील तरतूदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात म्हटले आहे.
error: Content is protected !!