धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 182 कारवाया करुन 1,75,050₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-रोहीत चंद्रकांत नन्नवरे, वय 34 वर्षे, रा.वेताळनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.30.08.2024 रोजी 18.30 वा. सु.वेताळनगर कडे जाणारे रोडलगत सागर अंकुश शिंदे यांचे घराचे बाजूस अंदाजे 720 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-महेश सुरेश शिंगोडे, रा. भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.30.08.2024 रोजी 19.30 वा. सु.भिमनगर येथील बनसोडे कॉम्पलेक्सच्या समोर अंदाजे 5,600 ₹ किंमतीची 70 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.30.08.2024 रोजी 13.00 वा. सु.मुरुम पो ठाणे हद्दीत भोसगा शिवारात एन एच 65 रोडचे दक्षिणेस पानटपरी समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बालाजी बसु कारले, वय 35 वर्षे, रा.विलासपुर पांढरी ता. लोहारा जि. धाराशिव हे 13.00 वा. सु. भोसगा शिवारात एनएच 65 रोडचे दक्षिणेस पानटपरी समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.30.08.2024 रोजी 15.20 वा. सु. येरमाळा पो.ठाणे हद्दीत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बालाजी सुब्राव निकम, वय 40 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव हे 15.20 वा. सु. बांगर हॉटेल रत्नापूर समोर लिबांच्या झाडाखाली कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे- प्रविध गणपती जगताप, वय 38 वर्षे, रा.भातंगळी ता. लोहारा जि. धाराशिव,महादेव राम पाटील, वय 40 वर्षे, रा. माळेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दोघे दि.30.08.2024 रोजी 18.00 ते 19.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे क्रुझर एमएच 11 एडब्ल्यु 3018 व क्रुझर क्र एमएच 13 एसी 1045 ही वाहने लोहारा ते कानेगाव जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
लोहारा पोलीस ठाणे: दि. 26.08.2024 रोजी 19.00 ते दि. 27.08.2024 रोजी 06.00 वा. सु.धानुरी येथील देवबेट देवी मंदीरातील मागील दरवाज्याचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन मंदीरातील पेटीमधील अंदाजे 30,000₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भुजंग त्रंबकराव पूरी, वय 45 वर्षे, रा. धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.29.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4),305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
्मारहाण.”
येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे- शिवाजी जाधवर, गणेश जाधवर व इतर 6 अनोळखी इसम यांनी दि. 29.08.2024 रोजी 22.30 वा. सु. येरमाळा ते बीड जाणारे एन एच 52 रोडलगत रत्नापूर शिवारातील चंदन बिअरबार येथे फिर्यादी नामे- अशोक बळीराम जाधवर, वय 30 वर्षे, रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काचेच्या बॉटलने मारहाण करुन जखमी केले. त्यावर फिर्यादीचा मित्र राजु जाधवर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक जाधवर यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 190, 191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे- सद्दाम पापा शेख, सलगरा दि., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 22.08.2024 रोजी 21.30 वा. सु. सलगरा गावातील बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिर्यादी नामे- बळीराम दादाराव लोमटे, वय 36 वर्षे, रा.सलगरा दि., ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे का दिले नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन कानाला चावा घेवून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम लोमटे यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117(2), 115(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे- अभय शत्रुघ्न साळुंखे, उप चेअरमन रा. पुणे, कल्लेश्वर नारायणराव जाधव,तंज्ञ संचालक, राजु उत्तम गोसावी, संचालक, बाळासाहेब ज्ञानेश्वर शेळके, लिंबाळा ता. उमरगा, ज्योती शत्रुघ्न साळुंखे रा.पुणे वंदना शरद दिक्षीत, रा. पुणे, राजेंद्र महारुद्र जाधव,रा. होळी ता. लोहारा,सचिन दिंगबर कदम, रा. तुळजापूर जि. धाराशिव,दिलीप लक्ष्मण सिंदफळे,रा. खसगी ता.उमरगा जि. धाराशिव, प्रफुल्ल माणिकराव बाबळसुरे, लक्ष्मण विश्वनाथ कोळगे, रा. डाळींब ता. उमरगा जि. धाराशिव, गोविंद वसंतराव पवार, रा. सास्तुर,ता. लोहारा, सजंय गोपीनाथ जेटीधारे यांनी दि. 30.07.2024 रोजी पुर्वी मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी 12 लि. बॅच सास्तुर येथे फिर्यादी नामे-संजय ओमप्रकाश मनाळे, वय 54 वर्षे, रा. होळी ता. लोहारा जि. धाराशिव यांची व इतर ठेवीदांची नमुद आरोपींनी संगणमत करुन आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून 71, 98, 702 मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज परत न करता पैशाचा अपहार करुन फसणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संजय मनाळे यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4), 316(2), 316(5), 61(2), 3(5) सह कलम 3 महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षणअधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
कळंब पोलीस ठाणे: मयत नामे- विलास अंकुश कवडे, व सोबत जखमी नामे- रामराजे वष्णु कवडे दोघे रा.कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे दोघे दि.15.08.2024 रोजी सांयकाळी 12.15 वा. सु. कन्हेरवाडी पाटी येथुन मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान टाटा व्हिस्टा कार क्र एमएच 12 एफपी 9160 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून विलास कवडे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात विलास कवडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर रामराजे कवडे हे जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विशाल विलास मिटकरी, वय 35 वर्षे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(2), 125(अ), 125(ब) सह मोवाका कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश