कळंब – शहरातील ढोकी रोडवरील संभाजी नगरातील समता इंग्लिश स्कुलमध्ये दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्याध्यापिका वनिता टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बालकांनी बालश्रीकृष्ण,गोप,गोपिका, सवंगडी यांची वेशभूषा,मोरपीस असलेला मुकुट,मुरली वाजवीत असलेला बालश्रीकृष्ण त्याच्याभोवती फेर धरून गोपिका नृत्य करीत आहेत तसेच दहीहंडी फोडत आहेत हा कलाप्रकार सादर केला. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षिका सना पठान,किरन काले,मोहिनी देवकते,नमिता साखरे व प्रमोद चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन