धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 136 कारवाया करुन 1,08,250 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे: आरोपी नामे- ताई शहाजी शिंदे, वय 35 वर्षे, रा.गोलेगाव पारधी पिढी ता.भुम जि. धाराशिव या दि.23.08.2024 रोजी 11.30 वा. सु. रोहीत गायकवाड यांच्या गोलाई चौकातील गाळ्यात अंदाजे 2,000₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-अमोल विक्रम धोत्रे, वय 24 वर्षे, रा. कैकाडी गल्ली, भुम, ता. भुम, जि. धाराशिव हे दि. 23.08.2024 रोजी 12.15 वा. सु. गणेश शेंडके यांच्या गोलाई चौकातील गाळ्याचे पाठीमागे शेडसमोरअंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे- रेश्मा विजय शिंदे, वय 29 वर्षे, रा. भोगजी, ता. कळंब, जि. धाराशिव या दि.23.08.2024 रोजी 11.20 वा. सु. पिंपळगाव ते कळंब जाणारे रोडलगत भोगजी चौफुला येथे अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे- संगीता नारायण शिंदे, वय 27 वर्षे, रा. इंदापूर रोड वाशी ता. वाशी जि. धाराशिव या दि.23.08.2024 रोजी 11.10 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 790 ₹ किंमतीची 8 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे- महेश विजय लोंढे, वय 33 वर्षे, रा.हंगरगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.23.08.2024 रोजी 19.40 वा. सु. हंगरगा गावाजवळ रोडलगत अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे- समीर चांद कोरबु, वय 30 वर्षे, रा.तेर ता. जि. धाराशिव हे दि.23.08.2024 रोजी 18.30 वा. सु. पळसप रोड ते तेर रोडलगत तुळजाई गार्डन धाब्याजवळ अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे- संदीप विजय निनात, वय 39 वर्षे, रा.आगड गल्ली ता. जि. धाराशिव हे दि.23.08.2024 रोजी 19.30 वा. सु. आठवडी बाजारात मच्छीमार्केटच्या बाजूला अंदाजे 1,200 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.23.08.2024 रोजी 13.10 वा. सु. येरमाळा पो.ठाणे हद्दीत उक्कडगाव कडे जाणारे रोडच्या बाजूला येडेश्वरी मंदीर परिसर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- संस्कार उर्फ ऋषी राजेंद्र काळे, वय 22 वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव हे 13.10 वा. सु. उक्कडगाव कडे जाणारे रोडच्या बाजूला येडेश्वरी मंदीर परिसर येथे टायगर जुगाराचे साहित्यासह एकुण 2,300 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.23.08.2024 रोजी 19.00 वा. सु.धाराशिव शहर पो.ठाणे हद्दीत साठेनगर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गोविंद तानाजी विधाते, वय 28 वर्षे, रा. तेरणा कॉलेज जवळ धाराशिव ता.जि. धाराशिव हे 19.00 वा. सु.साठेनगर येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 580 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-अखलाख लतीफ कुरेशी, वय 45 वर्षे, रा. विजापुर वेस ता. जि. सोलापूर यांनी दि.23.08.2024 रोजी 21.10 वा. सु. कठारे मिल समोर तामलवाडी येथे छोटा हत्ती क्र एमएच 13 ए.एन 5349 या वाहनामध्ये तीन हालगट यांना दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना तामलावाडी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11(1), 11(1)(डी), 11(1)(एफ), 11 (ई),11(1)(एच), मपोअ 119 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :पिकअप क्र एमएच 42 एम 9507 चा चालक यांनी दि.22.08.2024 रोजी 19.09 वा. सु. बीड ते धाराशिव जाणारे एनएच 52 रोडचे कडेला अमोल वणवे यांचे शेताजवळ पिकअपहे हायगयी व निष्काळजीपणे चालवून पिकअपचे पाइीमागील टायर निघून पिकअप उजव्या बाजूस झुकून वाहनामधील कत्तलीसाइी घेवून जात असलेल्या गोवंशीय जातीचे चार जर्शी गायी व नऊ जर्शी गायीचे वासरे यांना दाटीवाटीने कोंबून गायी व वासरांना गंभीर जखमी करणेस कारणीभुत झाला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास भा.न्या.सं. कलम 281, 324,(4)(4)(5), 325 सह निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1),(डी)(एफ)(के)(एच) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5,5(अ),(1)(2), 5 (ब) मपोअ 119, मोवाका कलम 83/177, 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तामलवाडी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-धनाजी महादेव सांळुके वय 45 वर्षे, रा. पांगरधरवाडी ता तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंदाजे 2,50,000₹ किंमतीचे छोटा हत्ती वाहन क्र एमएच 13 एएन 4672 हे दि. 21.08.2024 रोजी रात्री 10.00 ते दि. 22.08.2024 रोजी 06.00 वा. सु. सांगवी ते पांगरधरवाडी रोडवरील गोडावून समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-धनाजी सांळुके यांनी दि.23.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- विशाल महादेव कस्तुरे, वय 28 वर्षे, रा.काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 45,000₹ किंमतीची म्हैस ही दि. 17.08.2024 रोजी 19.00ते दि. 18.08.2024 रोजी 06.00 वा. सु. घाट्टेवाडी शेत शिवार शेत गट नं 408 गोठ्यातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल कस्तुरे यांनी दि.23.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
वाशी पोलीस ठाणे: मयत नामे- विश्वास भिमराव लवटे, वय 38 वर्षे, रा.घाटनांदुरी ता. भुम जि. धाराशिव हे दि.19.08.2024 रोजी संध्याकाळी 06.00 ते 06.30 वा. सु. भुम जाणारे रोडवर घाटनांदुरी शिवारातील आरती हॉटेल जवळ नैसर्गिक विधी साठी उभा होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 6779 चाचालक नामे-ज्ञानेश्वर उर्फ भैय्या भागवत गिरी, विकास उर्फ विकी आनंदराव लिमंकर दोघे रा. आंद्रुड ता. भुम जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून विश्वास लवटे यांना धडक दिली. या अपघातात विश्वास लवटे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैशाली विश्वास लवटे, वय 32 वर्षे, रा. घाटनांदुरी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.23.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह मोवाका कलम 184, 65(अ) मदाकाअन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान