August 8, 2025

छत्रपती

  • एका सत्पुरुषांने एका मराठी मावळ्याला विचारलं.तुम्ही कोणाचे वंशज आहात?
    युवकांने छाती फुगऊन, ताठ मानेने,रुबाबशिरपने लगेच उत्तर दिलं.*छत्रपती शिवरायांचे.*
    त्यांनी दुसरा प्रश्न विचारला तुमचा धर्म कुठला?
    त्यांनी सांगितलं छत्रपतीचा विचार हाच आमचा धर्म आहे.
    सत्पुरुषाने तिसरा प्रश्न विचारला
    शिवछत्रपती हा जर तुमचा धर्म, जात, आणि विचार असेल तर तुमच्या हजेरीत हिंदू नाव कसे.?
    तो म्हणला मला माहित नाही.माझ्या गुरुजींनी लिहिलं,म्हणून मी हिंदू आहे.
    त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला
    छत्रपती शिवरायांना कुठला धर्म होता.आणि कोणत्या धर्मासाठी त्यांनी कार्य केले?
    तो चाचपडला त्यास उत्तर देता आले नाही. शेवटी म्हणला हिंदू असेल बाबा.
    त्याने पुन्हा प्रश्न विचारलं
    हिंदू असे म्हणतोस परंतु छत्रपती शिवरायांच्या विचारांमध्ये,आचरणामध्ये, विविध कार्य आणि इतिहासामध्ये कुठेही हिंदूंसाठी लढाई झाली. हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई झाली.अशी कोठेही नोंद नाही.तर छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म कसा? छत्रपती हिंदूंचा राजा कसा? ते तर रयतेचे राजे होते.त्यांनी तर बहुजनांचं / रयतेचं राज्य स्थापन केलं. हे तुला पटतय का??
    हो साहेब!!!! हो पटतंयचं. छत्रपती शिवराय हे रयतेचेच राजे होतेच.
    त्याने पुन्हा प्रश्न विचारला
    जर छत्रपती रयतेचे राजे होते तर मग तुझ्या मनामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष कसा??
    एका बाजूला छत्रपतीना स्वीकारतो,आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून मुस्लिम जातीला,त्या समाजाला नाकरतो.हा विरोधाभास आहे असं वाटत नाही का?छत्रपती शिवरायांना तर जात नव्हती,धर्म नव्हता,ते बहुजनांचे राजे,रयतेचे राजे होते.मग तुझा धर्म हिंदू आला कुठून. हिंदू या शब्दाचा वापर करून तुझ्या मनामध्ये हिंदू म्हूणन मुस्लिम द्वेष तर कोणी पसरवत नाही ना?मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव तर कोणी करायला तुला प्रेरणा देत नाही ना?
    अनेक प्रश्नांनीं मावळ्या भोवती घेरं धरला.डोकं गरगरायला लागलं. सत्याची साक्षी मिळत होती.योग्य- अयोग्यता समजायला लागली होती.
    त्याने पुन्हा प्रश्न विचारला
    छत्रपतीचा विचार तुला मान्य आहे.
    हो मान्य आहे.
    मग समजून घे जर छत्रपतींना जात नसते. छत्रपतींना धर्म नसतो.छत्रपती हा रयतेचा राजा असतो.हे जर मान्य असेल तर आपण मुस्लिमांचा का द्वेष करतो???
    असे विचारल्यानंतर मावळा शरण गेला.खरंच तुम्ही माझी समज वाढवली.खरंच छत्रपती हे रयतेचे राज्य होते.म्हणून छत्रपतींनी रयतेचे राज्य स्थापन केलं.स्वराज्य निर्माण केले.स्वराज्य निर्माण केले.ते कुठल्या जातीचे नव्हते.कुठल्या धर्माचे नव्हते.ते रयतेचे राजे होते.आता मला समजलं. आपण माझ्यातली समज वाढविला.त्याबद्दल धन्यवाद.
    तो सतपुरुष जाता जाता म्हणाला
    जेव्हा आम्ही संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव,सर्व जाती समभाव असे मानत असू तर मग आपण का कोणत्या जातीचा आणि धर्माचा द्वेष करावा? छत्रपतींनी जर सर्वांना समान मानलं.भारतीय संविधान सर्वांना समान मानत असेल तर आपल्या मनामध्ये जातीचा आणि धर्माचा द्वेष करून कोणी विषारी बीजे तर पेरत नाही ना?धर्माच्या आणि जातीच्या बीजेला कोण खतपाणी घालतं तर नाही ना?याचा विचार करावा.जे वाईट आहे, त्याचा तिरस्कार आणि धिक्कार करावा. राष्ट्रबांधणी मध्ये सर्वांनी पुढाकार घ्यावा.
    मित्रा ज्या छत्रपती शिवरायांच्या संघटनेमध्ये, सैनिकांमध्ये,राज्यामध्ये सर्व धर्मातले,सर्व जातीतले शूर शिलेदार होते.त्यांचं नाव होतं मावळा.मावळा म्हणून संबोधले की जाती आणि धर्माचे साखळदंड निखळून पडतात.त्याच शिवरायांच्या राज्यामध्ये सर्व धर्म समभाव होता.उच नीचता नव्हती.प्रत्येक निष्ठावंतांचा सन्मान होता.शिवरायांच्या विचार घेऊन प्राण पणाला लावणारा,रक्त सांडणारा येथे प्रत्येक जातीतला शूर मावळ पुन्हा नव्याने जन्म घेत होता.
    खऱ्या अर्थाने छत्रपती हाच आमचा धर्म आहे. छत्रपती हाच आमचा विचार आहे. आणि भारतीय संविधान हे आमच्या लोकशाहीतिला तमाम जनतेचा धर्म आहे……
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे म्हणत तो निघून गेला.

  • *मंथनकार*–
    *भूमिपुत्र वाघ.*
    संपर्क – 9172972482

error: Content is protected !!