कळंब तालुका शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
कळंब – बदलापूर शहरामध्ये शाळेतील चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांनी उपविभागीय अधिकारी कळंब यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनात शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये नं.१ वर आला आहे.यावर सरकारचे लक्ष नाही की काय..? असा प्रश्न विचारला असून बदलापूरमध्ये शाळेतील चार वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. तमाम महाराष्ट्रातील माता-भगिणी-शाळकरी मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याचार करणाऱ्या नीच नराधमांना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देऊन त्या पिडीत चिमुकल्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रा.श्रीधर भवर ,आक्रुर सोनटक्के,आबासाहेब आडसुळ,संतोष पवार,विठ्ठल माने,भिमा हगारे,आफताब तांबोळी,किरण खोसे,विठ्ठल कोकाटे,फैजान पटेल,तबरेज हन्नुरे महिला पदाधिकारी सलमा भाभी सौदागर,शोभाताई मस्के, सुनंदाताई भोसले तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन