कळंब (माधवसिंग राजपूत) – कळंब तालुक्यातीलच नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के.कुलकर्णी यांचे शैक्षणिक कर्तृत्व,साने गुरुजींचे विचार कथामालेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पोहचवण्याबरोबरच निखळ मैत्रीचा झरा ओसंडून वाहणारे डी.के सरांच्या अमृतमहोत्सवी शुभारंभ प्रसंगी मला शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे हृदयपूर्वक उदगार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी काढले.
शैक्षणिक,सामाजिक, चळवळीतील आग्रण्य व डी.के. या नावाने सर्व परिचित दत्तात्रय कमलाकर कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि.२२ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक,तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. डी.के.कुलकर्णी हे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक असून सेवा निवृत्त मुख्याध्यापक आहेत. तसेच अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेश कार्यकारणी सदस्य तसेच मुख्याध्यापक संघाचे आधारस्तंभ आहेत तसेच कळंब शहरातील सामाजिक व राष्ट्रीय व समाज प्रबोधन कार्यात त्यांचा हिरारीने सहभाग असतो त्यांचा ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने फेटा,शाल,श्रीफळ,बुके व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यामध्ये ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज अडसूळ, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,कळंब येथील अन्नदाते बंडोपंत (बापू ) दशरथ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर ,स्वराज इंडियाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके,डॉ.माणिकराव डिकले, विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, विधीज्ञ दिलीपसिंह देशमुख, सा.साक्षी पावनज्योतच्या कायदेशीर सल्लागार विधीज्ञ शकुंतला फाटक,रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे संजय घुले, शिशिर राजमाने ,सचिन पवार, नारकर ,धर्मेंद्र शहा, बीदादा, श्रीकांत कळंबकर, चौधरी, eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटना तालुका सचिव अच्युतराव माने,बंडू ताटे,संदीप कोकाटे ,ब्रुवान पांचाळ, यादव, निलेश पांचाळ,जैन संघटनेचे बाबुशेठ लोढा,उद्योजक विठ्ठल माने ,तापडिया,जे.के.कुलकर्णी, संदीप बावीकर ,जोशी, साने गुरुजी कथा मालेच्यावतीने सोपान पवार ,प्राचार्य महादेव गपाट, प्रदीप यादव यांनी सत्कार केला. उपस्थितांचे आभार डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी मानले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन