धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – उस्मानाबाद जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सहकारी पतसंस्था ही अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांच्या आर्थिक अडचणीवर तातडीने मात करणारी एकमेव पतसंस्था असल्याचे मत कार्यकर्ती पल्लवी घोडके यांनी व्यक्त केले. या पतसंस्थेत तीन-चार कर्मचारी कार्यरत असले तरी पतसंस्थेच्या संपूर्ण कामाची जबाबदारी वरिष्ठ लिपिक सचिन सांगळे यांच्यावर असून सुद्धा अवघ्या दहा मिनिटात कर्ज प्रकरण मंजूर करून तात्काळ चेक देणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. लातूर जिल्ह्यातील बोरगाव (काळे) येथील भगवानराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाची स्थापना करून आरोग्य व अंगणवाडी सेविकांचे प्रश्न शासन-प्रशासनाच्या निर्देशनास आणून सेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले आहे. सेविकांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यावर पतसंस्थांची स्थापना करून सेविकांचे आश्रू पुसण्याचे काम केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान