August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात अँटीरॅगिंग जनजागृती सप्ताह साजरा

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी शि. म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे अंर्तगत गुणवत्ता कक्ष,भारतीय छात्र सेना,आणि अँटीरॅगिंग समिती याच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाद्वारे अँटी रॅगिंग जनजागृती सप्ताह दिनांक १२ ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान साजरा करण्यात आला .
    दिनांक १२ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दत्ता साकोळे यांच्या अभिमुखता कार्यक्रमाने झाली. नवीन विद्यार्थ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम आणि अभिमुखता सत्र आयोजित करण्यात आले त्यात डॉ.दत्ता साकोळे यांनी रॅगिंग म्हणजे काय? रॅगिंगचे परिणाम आणि रॅगिंगविरोधी उपाययोजना याबद्धल माहिती दिली . महाविद्यालयाने अँटी रॅगिंगची समिती ची स्थापना केली आहे, समितीमध्ये प्राध्यापक ,सदस्य, प्रशासक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश केला . स्मिती काय काम करते याबद्दल माहिती दिली. यानंतर अँटी रॅगिंग लघुचित्रपट प्रसारण करण्यात आले,या सत्राचे संचालन प्रा.मुखेडकर आणि आभार डॉ. भोसले यांनी केले
    दिनांक १६ ऑगस्ट रोजी डॉ. दीपक सुर्यवंशी यांनी अँटीरॅगिंग मार्गदर्शन, नियम, आणि प्रतिबंधात्मक पद्धती याबद्दल मार्गदर्शन केले .या सप्ताहात ,भीतीपत्रक ,लोगो,घोषवाक्य , निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी मनापासून वचनबद्ध केले की
    रॅगिंगच्या कोणत्याही कृतीपासून स्वतःला परावृत्त करा आणि संस्थेमध्ये रॅगिंगमुक्त वातावरण सुनिश्चित करा.
    त्यानंतर जनजागृतीसाठी प्रागणात एनसीसी मुले आणि मुली द्वारे रॅगिंगचे हानिकारक परिणाम यावर पथनाट्य सादर करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन डॉ. पावडे प्रास्ताविक प्रा. मुखेडकर आणि आभार डॉ. मीनाक्षी जाधव यांनी मांडले , या कार्यक्रमाचे आयोजन आंतरिक गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर, कार्यक्रम समन्वयक लेफ्ट.डॉ.के.डब्लू.पवाडे. समिती सदस्य डॉ.एस.बी.भोसले, डॉ.एम.बी.जाधव यांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.भगवान, प्रोफेसर.चिंते,प्रोफेसर गुंडरे ,डॉ.कमलाकर जाधव,डॉ. साठे, डॉ.सूर्यवंशी, डॉ. ताटीपामुल, डॉ.राठोड, श्री.अंकुशराव, डॉ.मस्के, सूरज गपाट, या कार्यक्रमास उपस्थित होते .तांत्रिक सहकार्य श्री.हनुमंत जाधव, सहायक ग्रंथपाल श्री.अरविंद शिंदे व श्री.संदिप सुर्यवंशी ,जया पांचाळ यांनी केले.याबद्दल प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी सर्वांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले व प्रोत्साहन दिले
error: Content is protected !!