धाराशिव (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.)च्या जिल्हा कार्यालयाकडे थेट कर्ज योजनेतंर्गत लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आले आहेत.ज्या अर्जदारांनी ऑनलाईन भरले आहेत त्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालयाकडे 14 ऑगस्टपर्यंत तीन प्रतीत हार्डकॉपी/अर्ज जमा करावे.असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने 5 लाख रुपयांची सुविधा कर्ज योजना आणि 1 लाख 40 हजार रुपयांची महिला समृध्दी कर्ज योजना अशा थेट योजना सुरु आहेत.या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी तीन प्रतीत हार्डकॉपी/ अर्ज जमा केला नाही.लाभार्थी अर्जदारांनी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज जमा करावे.जमा न केलेल्या ऑनलाईन अर्ज रदद समजण्यात येवून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांनी दिली.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान