August 8, 2025

भिम आर्मी भारत एकता मिशनमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

  • नांदेड (अंकुश पोवाडे) – भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद,राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांच्या कार्यावर प्रेरित होऊन राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे,महाराष्ट्र राज्य माजी कार्याध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आणि मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड मधील वेगवेगळ्या संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भीम आर्मी मध्ये जाहीर प्रवेश केला.
    मुदखेड या ठिकाणी झालेल्या प्रवेश सोहळ्यामध्ये भाई चंद्रशेखर आजाद यांचे हात आणखीन बळकट करण्याची गरज आहे.त्यासाठी गाव तिथे शाखा असणे गरजेचे आहे असे मत मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी मांडले.
    संसदेमध्ये गोरगरीब लोकांचा, पिढींचा आवाज भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून घुमत आहे असे मत महाराष्ट्राचे माजी कार्याध्यक्ष सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले.
    महाराष्ट्रात दिवसेंदिवस अन्य अत्याचार वाढलेला आहे तो रोखण्याची गरज आहे. त्यासाठी आपली एक सक्षम टीम तयार असणे गरजेचे आहे, तसेच नांदेडमध्ये पुढच्या महिन्यात मराठवाड्यातील दलिता हत्याकांडाच्या विरोधात एक मोर्चाचे आयोजन करावे असे मत राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी व्यक्त केले.
error: Content is protected !!