धाराशिव – धाराशिव तालुक्यातील मुळ गाव रुई ढोकी येथील असुन विक्रांत रवींद्र देटे पाटील हा विद्यार्थी दिनांक 7 ऑगस्ट 24 रोजी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे विक्रांत देठे पाटील यांचे प्राथमिक शिक्षण धाराशिव येथील तेरणा पब्लिक स्कूल येथे तर शालेय शिक्षण पुणे येथील क्लाईनमेमोरियल ( आय सी एस ई बोर्ड) पुणे येथे झाले पुढे पुणे येथील जे एस पी एम विद्यापीठातून आय टी इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यापुढील शिक्षण अमेरिकेतील नामांकित नॉर्थ कॅरोलीना स्टेट युनिव्हर्सिटी तुन तो एम एस चे शिक्षण पूर्ण करणार आहे तसेच शिक्षण पूर्ण करत असतानाच अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत तो आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत राहणार आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाणार असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे व अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत या भरघोस यशाचे श्रेय आई ॲड उल्का ज्या स्वतः M.Sc.chem त्याना जाते असे विक्रांत याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विक्रांत देटे हा पुढील दोन वर्ष अमेरीकेत असणार आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी