August 9, 2025

आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा भूतान देशाकडून घ्यावी – प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड

  • लातूर – बौद्ध धर्मियांचे बहुसंख्य प्रमाण असलेला, सर्वाधिक आनंदी जीवन जगणाऱ्या लोकांचा भूतान हा देश लहान असला तरी मानवीयतेच्या दृष्टिकोनातून महान ठरतो. दैनंदिन जीवन जगताना अनेक ज्वलंत प्रश्न आपल्याला भेडसावतात अशा स्थितीतही आपण भूतान पासून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्राचार्य प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. नुकतेच ते भूतान येथील नॉरबुलिंग रायटर कॉलेज, कांगलुंग येथे इस्टर्न हिमालयीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, युवा सक्षमीकरण व संशोधन परिषद तसेच कॉमर्स अँड मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्योजकता आणि व्यवसाय स्थिरता”या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
    पुढे बोलताना म्हणाले की, धूम्रपानावर बंदी घालणारे भूतान हे जगातील पहिले राष्ट्र आहे. तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा तंबाखू विक्री बेकायदेशीर आहे. या कायद्याचे तेथील लोक स्वयंस्फूर्तपणे पालन करतात हे विशेष आहे. स्वच्छता, शिस्त, संयमीपणा, सहिष्णुवृत्ती हा येथील लोक जीवनाचा पाया आहे. भूतानमध्ये राजधानी असलेले थिंपू शहर आणि पुनाखा हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या देशाने नैसर्गिक साधनसंपदेची जपणूक अत्यंत तळमळीने केली आहे. पर्यावरणाचे जपण करण्यातच लोकांना मनापासून समाधान वाटते. त्याचे कारण म्हणजे त्यांच्यावर पूर्वापार होत आलेले संस्कार होय. येत्या काळात भूतान आता संख्येपेक्षा गुणवत्तेकडे लक्ष देणार आहे. हे त्यांच्या प्रगतशील वाटचाली मधून लक्षात येते.
    यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, भूतान देशातील लोक सहिष्णू असल्यामुळे त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे असे सांगून अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!