August 9, 2025

1 ऑगस्टपासून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी

  • धाराशिव (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2024 पासून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. बंगलोर येथील बेल(BEL) या उत्पादक कंपनीकडून ही तपासणी करण्यात येणार आहे. बंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक कंपनी (BEL) च्या सहा अभियंत्यांची नियुक्ती तपासणीसाठी भारत निवडणूक आयोगाने केली आहे.
  • धाराशिव तालुक्यातील मौजे पिंपरी येथील शासकीय ईव्हीएम व्हीव्हीपॅट गोदामात 1 ऑगस्टपासून या मशीनची प्रथमस्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.या कामासाठी आवश्यक अधिकारी,मास्टर ट्रेनर/ मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे तपासणीचे कामकाज एक महिना सुरू राहणार आहे.हे काम सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात होणार आहे.
  • जिल्ह्यातील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी/प्रतिनिधी यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणीच्या वेळी उपस्थित राहून ईव्हीएम मशीनविषयी माहिती जाणून घ्यावी.याबाबत काही शंका,प्रश्न असतील तर त्याचे निराकरण भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या अभियंत्यांकडून करून घ्यावे.असे जिल्हा निवडणूक अधिकारी शिरसाधव यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!