कोल्हापूर – विशाल गडावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात कोल्हापूर या ठिकाणी जण आंदोलन उभारावे यासाठी कोल्हापूर या ठिकाणी भीम आर्मी जिल्हा बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे यांनी केले होते. या बैठकीस महाराष्ट्र प्रमुख सितारामजी गंगावणे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, लातूर तालुका अध्यक्ष बप्पा घनगावकर, प्रसाद बाबा ढगे (लातूर ), वैजनाथ भाऊ लवटे (लातूर), सुशील भाऊ खुणे(लातूर)मयूर गंगावणे, भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग यांनी कोल्हापूर मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात एक जण आंदोलन उभे करावे, आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, पिढीताना न्याय आणि भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करावे असे आदेश भाई चंद्रशेखर आजाद, आणि भाई विनयरतन सिंग यांनी दिली आहे.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गंगावणे म्हणाले, भीम आर्मी संघटना ही कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी काम न करता सर्व जाती धर्मातील पीडित लोकांसाठी काम करते, होणाऱ्या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे फलक सर्वांच्या हातामध्ये असावे, कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये हे आंदोलन आपल्यावर झालेल्या अन्य अत्याचाराच्या विरोधात असेल असे मत मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी व्यक्त केले यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशन चे पोलीस उप निरीक्षक माने यांना निवेदन देण्यात आले.शिरीष थोरात ( रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष ),जावेद मुजावर (ग्रामपंचायत सदस्य, आळते ), हर्षद कांबळे (जिल्हाध्यक्ष rpi खरात गट,ग्रा.पं. सदस्य, चोकाक),सुकमार कोठावळे (चेअरमन),सद्दाम मुजावर,सागर कांबळे, करीम मुजावर,तुषार कांबळे, अय्याज मुजावर,अमीर मुजावर, करीम मुल्ला,सौरभ कोठावळे, समीर मुजावर, असिफ मुजावर, इरफान मुजावर व इतर मान्यवर उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे