June 26, 2025

भाई उद्धवराव दादा पाटील यांना भाई नारायणराव लोमटे विद्यालयात अभिवादन

  • कळंब – दिनांक १२ जुलै २०२४ रोजी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी खासदार दिवंगत नेते भाई उद्धवराव दादा पाटील यांची ४० वी पुण्यतिथी निमित्त कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला
    याप्रसंगी भाई उद्धवराव पाटील दादा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश टेकाळे हे होते.
    यावेळी विद्यार्थ्यांना भाई उद्धवराव दादा पाटील यांच्या कार्याची माहिती एच.ए.पान ढवळे व मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी दिली.
    यावेळी शाळेतील शिक्षक एच.ए. पांनढवळे,एस.एस.डिकले, बी.व्ही.ओव्हाळ व शिक्षकेतर कर्मचारी चाळक,शिंदे व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!