कळंब – शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रुग्णालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.11जुलै 2024 रोजी शिवाजी कापसे (सचिव,शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कळंब) व सभापती (कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब) यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर,वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन छ.शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.धर्माधिकारी एन.एस व संस्थेचे कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आले. यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे व आरोग्य शिबिरातील सर्व तज्ञ कर्मचाराऱ्यांचे कॉलेजच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.धर्माधिकारी यानी आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरतात. जेव्हा आजार मोठा होतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते.त्यासाठी सर्वांनी धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यासाठी वेळोवेळी सर्वांनी प्रतिबंधात्मक चाचण्या करून घेणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे भविष्यात होणारे संभाव्य धोके टाळता येऊ शकते.या शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व सर्व विद्यार्थी तसेच कळंब शहरातील नागरीकांनी या आरोग्य शिबिरात उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवून महालँब च्या सहयोगाने विविध चाचण्या करून घेतल्या.यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यांनी केले सुत्रसंचालन एनएसएस विभागप्रमुख प्रा.मनिषा कळसकर यानी केले.प्रास्ताविक डॉ.उद्धव गंभिरे तर आभार प्रा.शफीक चौधरी यानी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ.गीते,डॉ.जोशी, डॉ. मोहळकर व त्यांचे सर्व तज्ञ कर्मचारी तसेच महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश