कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खा.सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सरला दिनकरराव खोसे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या विद्याभवन हायस्कूलच्या परिसरात व हाजरत तहसीलदार बाबा दरगाह शरिफ रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा सरला दिनकरराव खोसे,अर्चना हौसलमल,छाया पंडित,शाहीन मनियार, आयेशा बागवान,पद्मिनी वाघमारे,फेरोज मनियार,प्रफुल्ल गुजर,रूषी वाघमारे आदी उपस्थित होते.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट