August 9, 2025

आई-वडिलांच्या सुसंस्कारातून मी घडलो – सी.आर.घाडगे

  • कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आईची कडक शिस्तीचे तर वडिलांची संयमी- मनमिळावू आणि प्रामाणिकतेचे बाळकडू दिल्यामुळे आणि त्यांच्या सुसंस्कारामुळेच मी घडलो असल्याचे भावनात्मक उद् गार सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा केंद्राध्यक्ष सी.आर.घाडगे यांनी सत्कारास उत्तर देताना काढले.
    या प्रसंगी त्यांनी आपल्या भावना आनंदाश्रु मार्फत मोकळ्या केल्या. दिनांक १० जुलै २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कल्पना नगर येथील सी.आर.घाडगे यांच्या “राजगृह” या निवासस्थानी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था व सा. साक्षी पावन ज्योत परिवाराकडून त्यांच्या अमृत महोत्सवी निमित्त सपत्नीक शाल पुष्पहार व सा.साक्षी पावून ज्योत चा विशेषांक ह.भ.प महादेव महाराज अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

  • याप्रसंगी महादेव महाराज आडसूळ,भारतीय बौद्ध महासभेच्या सांस्कृतिक विभागाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष एल.आर.धावारे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी सी.आर.घाडगे यांच्या कार्याचे विश्लेषण केले.

  • या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी घाडगे दाम्पंत्याने एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यातील ७५ वर्षात केलेल्या कार्यकर्तत्वाचे उदाहरणासह वर्णन केले.
    सूत्रसंचालनातून प्रा.अविनाश घोडके यांनी सी.आर.घाडगे यांनी त्यांचा सी.आर कसा कायम नंबर एक वर ठेवला ते सांगितले.
error: Content is protected !!