धाराशिव – मी माझं कुटुंब उघड्यावर टाकून आलोय.मी मराठ्यांसाठी फिरतोय. तुमच्यातच माय-बाप बघतोय.मी भयंकर शारीरिक वेदना भोगत आहे.कधी तुमच्यात नसेन, सांगता येत नाही; मात्र असेपर्यंत आपले आरक्षण घेऊन दाखवेन. आपली लेकरं सरकारी वर्दीत पाहण्याचे माझे स्वप्न असल्याचे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला साथ देण्याची भावनिक साद घातली. धाराशिव शहरातून दि.१० जुलै २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शांतता रॅलीला संबोधित करताना अखेरच्या काही मिनिटात मनोज जरांगे पाटील हे काहीसे भावुक झाले.ते म्हणाले, आपल्याला सगळीकडून घेरण्याची तयारी सुरू आहे; मात्र मी कोणालाही मॅनेज होणारा नाही.माझ्याकडे कसलीही संपत्ती नाही.शेती नाही. मला काही जमवायचेही नाही. जे काही करतोय ते आपल्या समाजासाठी.फक्त तुम्ही सर्वांनी ताकदीने खंबीर साथ द्या.सर्वच पक्षातील मराठा मंत्री,खासदार, आमदारांना सांगतो,आतातरी जात वाचवा.जातीच्या पाठीशी राहा,अशी साद जरांगे पाटील यांनी घातली. गोरगरीब मराठा समाजातील माय-बापांनी मजुरी करून, शेती विकून आपली लेकरं शिकवली; मात्र केवळ आरक्षणाअभावी त्यांना नोकऱ्या – मिळाल्या नाहीत.अशी लेकरं जेव्हा मला भेटून व्यथा सांगतात, तेव्हा प्रचंड वेदना होतात. यामुळेच पुढील काळात आरक्षणाच्या मदतीने जेव्हा ही लेकरं आयएएस, आयपीएस होऊन सरकारी वर्दीत दिसतील, तेव्हाच समाधान मिळेल.हेच आपले अखेरचे स्वप्न असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश