August 9, 2025

भिम आर्मी ची समिक्षा बैठक संपन्न

  • लातूर – दि.१० जुलै २०२४ रोजी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे,जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह राजीव गांधी चौक लातूर या ठिकाणी भिम आर्मी च्या जबाबदार पदाधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण समिक्षा बैठक संपन्न झाली.या बैठकीत पुढील कामाची रूपरेषा व तसेच जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली.भिम आर्मी चे संस्थापक खासदार ॲड. भाई चंद्रशेखर आझाद यांना लवकरच लातूर आणण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी लातूर तालूक्यातील कार्यकर्ते अजय सिरसाठ यांची तालुका उपाध्यक्ष पदी तर हरीश सोनवणे कार्याध्यक्ष पदी तर अतूल भडके तालूका संघटक पदी तर निखील कांबळे तालुका सह संघटक लातूर तालूका पदावर निवड करण्यात आली.यावेळी या बैठकीत जिल्हा सचिव बबलू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे,जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे,जिल्हा संघटक प्रशांत घनगावकर, शहर अध्यक्ष संदीप कांबळे,शहर उपाध्यक्ष समाधान झोडपे,लातूर तालूका अध्यक्ष बप्पा घनगावकर, औसा तालुका अध्यक्ष समाधान कांबळे,उदगीर तालुका अध्यक्ष आकाश कस्तुरे, शहर अध्यक्ष राहुल कांबळे, अहमदपूर तालुका अध्यक्ष अफसर शेख, रेणापूर तालुका अध्यक्ष अजय कांबळे ,सुभाष बनसोडे व तालूक्यातील जबाबदार पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!