February 9, 2026

ग्रामीण कष्टकऱ्यांचे नेते साथी कासम भाई यांचे आकस्मित निधन

  • धाराशिव – भूमिहीन शेतमजूर व कष्टकरी शेतकऱ्यांसाठी उभी हयात खर्ची घातलेले, साथी कासम भाई यांचे अचानक निधन झाल्याची माहिती, जय किसान आंदोलन – स्वराज अभियान चे जिल्हा सरचिटणीस साथी रामचंद्र काळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. खुलताबाद व कन्नड तालुक्यातील हजारो एकर जमीन भूमीहीन शेतमजुरांच्या नावे करून देण्यात प्रमुख भूमिका साथी कासम भाई यांची राहिल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
    रोजगार हमी योजनेच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांचे शेतीमालास हमीभावाचा कायदा करण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक विमा व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई, या व अन्य मागण्यासाठी सातत्यपूर्ण संघर्ष केला.
    समाजात शांतता व सलोखा नांदावा म्हणून स्वराज अभियान ने पुकारलेल्या प्रत्येक शांततापूर्ण आंदोलनात साथी कासम भाई कायमच अग्रभागी राहिल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
    अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाचे कासम भाई जिल्हयातील सर्वच जाती – धर्मातील लोकांचे आधारस्तंभ असल्याने, त्यांचे जाण्याने सर्वच स्तरातील लोकांनी हळहळ व्यक्त केल्याचे, आवर्जून पत्रकात नमूद केले आहे.
    साथी कासम भाई गेल्याचे कळल्यावर त्यांचे ४० वर्षापासून चे त्यांचे सहकारी साथी सुभाष लोमटे, डॉ.सुधीर देशमुख, अड. सुभाष सावंगीकर, अड. विष्णू ढोबळे, साथी रंजन दाणी, आणि सहकारी संघटनांचे साथी एस.जी.शुत्तारी , कॉ. भिमराव बनसोड, कॉ. भगवान भोजने, अड. अभय टाकसाळ, प्रा. राम बाहेती, अड. के. हरिदास, प्रा. श्रीराम जाधव, प्रा. भारत शिरसाट, एम . ए. गफ्फार, कॉ. श्रीकांत फोपसे, कॉ. उमेश कुलकर्णी, प्रा. गीता कोल्हटकर, प्रा. प्रकाश दाणे, सुबेदार मेजर सुखदेव बन, डॉ. रश्मी बोरीकर, अर्चना मेढवार, प्रा. सुभाष महेर, प्रा. श्रीराम जाधव, इ नी आणि जिल्हयातील हजारो हमाल कष्टकऱ्यांनी त्यांचे जाण्याचे दुःख व्यक्त केले व भावपूर्ण आदरांजली वाहिली.
error: Content is protected !!