August 9, 2025

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी 11 जुलै रोजी शिबीर

  • धाराशिव (जिमाका) – अनुसूचित जाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी,शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारी इत्यादी अर्जदारांनी 30 जून 2024 पूर्वी समितीस दाखल केलेल्या अर्जाच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत,अशा अर्जदारांसाठी त्रुटी पूर्तता शिबीर 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या शेजारी धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे.

    शैक्षणिक प्रयोजनार्थ जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावांचे अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया नजीकच्या कालावधीत सुरु होत आहे.याकामी जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.अर्जदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे यांनी केले आहे

error: Content is protected !!