- धाराशिव (जिमाका) – महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात “ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ” योजना सुरु करण्यात आली आहे.
जिल्हयात नगरपालिका,नगर पंचायत व ग्रामपंचायत येथे व सेतू सुविधा केंद्रामध्ये पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ग्रामीण आणि शहरी भागात सद्यस्थितीला चालू आहे.तथापि या योजनेच्या प्राप्त अर्जाची संख्या विचारात घेता योजनेच्या लाभार्थीचे खूप कमी अर्ज दाखल होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हयातील धाराशिव,उमरगा,भूम व कळंब या महसूल उपविभागाअतंर्गत येणा-या सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका व नगर पंचायत येथे 10 ते 13 जुलै 2024 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हयातील “ मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ” या योजनेसाठी पात्र ठरु शकणा-या ग्रामीण भागातील महिलांनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि शहरी भागातील महिलांनी नगरपालिका / नगरपंचायत कार्यालयामध्ये 10 ते 13 जुलै-2024 या कालावधीत योजनेसाठी ठरवून दिलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून योजनेचे अर्ज भरण्याची कार्यवाही करावी.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश