August 9, 2025

1 जुलै रोजी लोकशाही दिन

  • धाराशिव (जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.1जुलै 2024 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन अप्पर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयीन कक्षामध्ये करण्यात आले आहे.या लोकशाही दिनात विविध कार्यालयाशी व विभागाशी संबंधित पूर्वी पाठविण्यात आलेल्या प्रलंबित तक्रारींच्या अहवालासह कार्यालय प्रमुखांनी उपस्थित राहावे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे हे विभागनिहाय प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणार आहे.तरी सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांनी या लोकशाही दिनाला उपस्थित राहावे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष भोर यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!