August 9, 2025

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची बाजार समितीस भेट

  • कळंब (साक्षी पावन ज्योत वृत्तसेवा ) – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी कृषि उत्पन बाजार समिती कळंब च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
    याप्रसंगी सभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, संचालक रोहन पारख,संचालक कोल्हे नाना,सर्व असोसिएशनचे सर्व व्यापारी बांधव,भागवत धस माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन,शिवाजीराव धुमाळ कुस्तीगीर असोसिएशन चे सदस्य,बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ,कर्मचारी उपस्थित होते.बाजार समितीस मागील एक वर्षांपासून नावलौकिक प्राप्त झाला आहे.आजून ही बाजार समिती ची प्रगती झाली पाहिजे शेतकरी हित जोपसलं पाहिजे शेतकरी सुखी तर सारे सुखी या साठी प्रयत्न करा अशा सूचना वजा मत व्यक्त केले.बाजार समितीच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.बाजार समितीच्या २६ एकर जागे बाबत नवीन प्लॅन करून एक व्यवस्थित व्यवसाय विकास आराखडा तयार करून बाजार समिती चा नावलौकिक करावा,यासाठी आवश्यक त्या परवानगी मिळ्ण्यासाठी साठी व इतर बाबी साठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.
error: Content is protected !!