August 9, 2025

मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याकडून ऊसाला एक रक्कमी एफआरपी प्रमाणे रक्कम अदा

  • धाराशिव – तुळजापूर तालुक्यात गत हंगामात नव्याने दाखल झालेल्या मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि. या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामात गाळप केलेल्या शेतकºयांच्या ऊसाला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दर दहा दिवसाने एक रक्कमी प्रती मेट्रीक टन २६०० रुपये प्रमाणे रक्कम अदा केली आहे. पहिल्याच हंगामात एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर देवुन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या आर्थीक हिताची जपणुक केली आहे, अशी माहिती कारखान्याच्यावतीने देण्यात आलेली आहे.
    मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि. या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगाम सन २०२३थ२४ मध्ये ४,०९, २११.६७६ मे. टन ऊसाचे गाळप करुन ४,४१,५२७ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर १०.९३६ टक्के इतका सरासरी साखर उतारा प्राप्त केला आहे. कारखान्याचे मार्गदर्शक तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार कारखान्याची वाटचाल यशस्वीपणे चालु आहे. गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याचा निव्वळ देय एफ.आर.पी. दर प्रती मेट्रीक टन रुपये २४३०.८२ एवढा येत आहे. परंतु कारखान्याने गाळप हंगामाच्या सुरुवातीपासुनच ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दर दहा दिवसाने एक रक्कमी प्रती मेट्रीक टन रु. २६००/- प्रमाणे रक्कम अदा करुन पहिल्याच हंगामात एफ.आर.पी. पेक्षा जास्त ऊस दर देवुन ऊस पुरवठादार शेतकºयांच्या आर्थीक हिताची जपणुक केली आहे. येणाऱ्या गाळप हंगामामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त साखर उतारा देणाऱ्या व हेक्टरी उत्पादनात वाढ होणाऱ्या ऊस जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होणेसाठी कारखान्यामार्फत ऊस विकास योजना राबविण्यात येणार आहे. तरी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेण्यात यावा, असे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी केले आहे.
error: Content is protected !!