मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्ती साठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या परिक्षेत मोहा येथिल ज्ञान प्रसार विद्यालयाचा निकाल 97.64 टक्के लागला असून ज्यामध्ये 75% च्या वर 36 विद्यार्थी आहेत.यश संपादन केलेल्या विद्यार्थी हे पुढीलप्रमाणे आहेत. *पाटील सृष्टी प्रमोद हिला 97.80% गुण मिळाले आहेत व ती शाळेतून प्रथम आहे. मडके श्रावणी ज्ञानेश्वर हिला 97.00% मिळालेले आहेत व ती शाळेतून द्वितीय आहे. तसेच झोरी अतुल अंगद याला 94.40% गुण मिळालेले आहेत. व तो शाळेतून तृतीय आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापु) मोहेकर,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश(भाऊ)मोहेकर संस्थेचे संचालक तात्यासाहेब पाटील,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मडके,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप ,पर्यवेक्षक संभाजी गिड्डे, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर