धाराशिव (जिमाका) – धाराशिव तालुक्यातील लाभार्थी ज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत असणाऱ्या संजयगांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अर्थसहाय्य यापुढे डी.बी.टी. प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांनी आधारकार्डची स्पष्ट झेरॉक्स,आधार लिंक असलेल्या बँक खाते क्रमांकाची स्पष्ट झेरॉक्स (खाते क्रमांक स्पष्ट दिसावा),मोबाईल क्रमांक (बँक खात्यास लिंक असलेला) (आधार कार्डच्या झेरॉक्सवर लिहावा), लाभार्थी प्रकार (अपंग/विधवा/दुर्धर/आजार/निराधार/तृतीयपंथी/शेतकरी आत्महत्त्या/निराधार वृध्द), लाभार्थी अपंग असेल तर अपंगाचे ऑनलाईन प्रमाणपत्राची स्पष्ट झेरॉक्स प्रत, विधवा असेल तर पतीचे मृत्यु प्रमाणपत्राची स्पष्ट झेरॉक्स,जातीचा प्रवर्ग (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/खुला) व शिधापत्रिकेचा प्रकार (पिवळे/केशरी) आदी कागदपत्रे तात्काळ जमा करणे आवश्यक आहे. धाराशिव तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांनी वरील कागदपत्रे आपले गावचे तलाठी यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय, धाराशिव येथील विशेष सहाय्य योजना विभागातील कर्मचारी श्रीमती स्वामी, तुगावे व श्रीमती खोत तसेच तलाठी डावकरे बालाजी, रमेश मधुकर वाघ,शामबाला कालीदास खोत,प्रतिक्षा गोविंदराव अंधारे,प्रगती नंदकुमार पवार,तेजश्री अरुण साळुंके राजकन्या गजेंद्र वडवणे,वर्षा बजरंग क्षीरसागर,कविता उत्तम मडके,इंगळे दिक्षा रणजीत,ठक्कुरवार वीणा गंगाधर,दत्ता बब्रुवान वाघमारे यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 30 मे 2024 पर्यंत जमा करावीत. जे लाभार्थी कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.असे आवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला